शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘कसमादे’ परिसरात ट्रकने वाळूची तस्करी

By admin | Updated: December 21, 2016 23:51 IST

नवा फंडा : कारवाईची मागणी

सटाणा : शहरासह तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या येथील तहसील प्रशासनाने आवळल्या असल्या तरी काही वाळूमाफियांनी यावर पर्याय शोधत नवाच फंडा सुरू केला आहे.  बागलाण तालुक्यातील गिरणा, मोसम आणि आरम या नद्यांमधून खुलेआम वाळू उपसा गत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू होता.  सटाणा तहसील प्रशासनाने मागील १५ ते २० दिवसांपासून अशा वाळूमाफियांवर बडगा उगारत कारवाई सुरू केली. त्यातल्या त्यात आमदारांनी विधानसभेत तहसील-दारांविरोधात हक्कभंग आणल्याने आणखीनच आक्रमक झालेल्या तहसीलदारांनी जंग जंग पछाडत एकाच रात्री वाळू उपसा करणारे दहा वाहने पकडून आणली.  छोट्या वाळूमाफियांवर झालेल्या या मोठ्या कारवाईने खूश झालेल्या काही बड्या वाळूमाफियांनी याला पर्याय शोधत संधीचे सोने करून घेतले आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीच्या वाळूचे लिलाव झाले नसले तरी या नदीमधून सटाणा, मालेगाव,  कळवण आणि नाशिकमध्ये तापीची वाळू छुप्या मार्गाने येत असून, स्थानिक छोट्या वाळूमाफियांवर तहसील प्रशासनाने मोठी दंडात्मक कारवाई केल्याने कसमादे परिसरात वाळूचे भाव कमालीचे वधारले आहेत. तापी नदीच्या वाळूमधील लिलाव झाले नसल्याने आणि स्थानिक वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्याने मोठी वाळूटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)