शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका म्हसरूळ उपकार्यालयाला ट्रकची धडक

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

पालिका म्हसरूळ उपकार्यालयाला ट्रकची धडक

 

नाशिक : गुजरातहून टाईल्स घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने मंगळवारी सकाळी म्हसरूळ महापालिकेच्या उपकार्यालयाला जोरदार धडक दिली़ यामध्ये एक दुचाकी व महापालिकेच्या उपकार्यालयाचे नुकसान झाले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, ट्रकचालक सलमान शेख याला अटक करण्यात आली आहे़मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुजरातहून टाईल्स व प्लॅस्टिक जाळ्या घेऊन जय शंकर गुड्स टान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच१७, ए जी ३२३३) दिंडोरी रोडने येत होता़ म्हसरूळ गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच वरवंडीरोड वळणावर ट्रकचालकाला अंदाज न आल्याने वरवंडी येथील दीपक नानासाहेब जाधव यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच१५, सीए१६३४) धडक देऊन महापालिकेच्या उपकार्यालयाला जाऊन धडकला़ या धडकेमुळे शेजारील डीपीवर दोन मोठे स्फ ोट होऊन प्रचंड आवाज झाला़यानंतर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता़ या घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे वाय़डी़ सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह पोहोचले व वीजपुरवठा सुरळीत केला़ दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी सकाळी दूधवाल्यांची मोठी गर्दी असते; मात्र रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांनी जागा बदलली आहे़ रस्त्याचे काम सुरू नसते तर याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती़ याप्रकरणी दीपक नानासाहेब जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)