शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरच्या कष्टकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’

By admin | Updated: August 3, 2015 23:19 IST

त्र्यंबकेश्वरच्या कष्टकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’

त्र्यंबकेश्वर : येथील कष्टकरी महिला, तरुणांना सध्या आखाडे, अन्नछत्रांमध्ये कामे व भरपूर मोबदला मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांना दोन महिन्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत.येथील विविध आखाडे, शिबिर, अन्नछत्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गजबजू लागली असून, लोकसंख्या वाढल्याने विविध कामांसाठी माणसांची गरज भासू लागली आहे. आखाडा, अन्नछत्रांमध्ये स्त्री-पुरुषांना ५०० ते १००० रुपये रोज दिला जात असून, त्याबदल्यात त्यांना स्वयंपाकाची, जेवणाची भांडी घासणे, साधू-महंतांचे, भक्तांचे, पूजेचे कपडे धुणे, साफसफाई करणे, भाज्या चिरून देणे, डाळ-तांदूळ धुवून देणे, धान्य निवडून देणे, पुऱ्या लाटून देणे आदि कामे करावी लागत आहेत. तरुण मुले आखाड्यातील महंतांना पूजेसाठी सामान आणून देणे, किराणा आणून देणे, भोजनावळींमध्ये वाढण्यास मदत करणे आदि कामे करत आहेत.या कष्टकरी महिलांना चहा, नाष्टा यांसह दोन वेळच्या जेवणाचाही लाभ मिळत असून, कुटुंबीयांसाठी अन्नपदार्थ नेण्याची मुभाही दिली जात आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेला येथील जवळपास सर्वच आखाड्यांमध्ये भंडाऱ्यांचे आयोजन केले होते. त्यावेळी कामगारांची आवश्यकता भासली. स्वयंपाकात गती असणाऱ्या तरुणांना अन्नछत्र, भंडाऱ्यांमध्ये स्वयंपाकाचीही कामे करण्याची संधी मिळाली. येथील आचाऱ्यांचे पाककौशल्य पाहून आखाड्यातील व्यवस्थापकांनी दोन महिन्यांसाठीचे कंत्राटच आचाऱ्यांना देऊन त्यांच्याशी करार करून घेतला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे आखाड्यांमध्ये अनेक कामे मिळतात. त्यामुळे दोन पैसे जोडण्याची ही संधी आहे. यासाठी आम्ही कष्ट करून रोजगाराची संधी साधणार आहोत.- सुमन फाळके, बबाबाई घागरेदोन महिने थोडे-अधिक कष्ट करावे लागणार असले तरी आर्थिक लाभही महत्त्वाचा आहे. या निमित्ताने साधू-महंतांची सेवा करण्याची संधी मिळते आणि पैसेही जोडता येतात. - मंगल झोले, त्र्यंबकेश्वर