शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

By admin | Updated: September 5, 2015 00:25 IST

त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

त्र्यंबकेश्वर : स्वामी इंद्रदेवजी महाराज यांचा पदवीदान सोहळा त्र्यंबकेश्वर येथील रेणुका हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. श्री आनंद आखाड्यातर्फे त्यांना हा सन्मान देण्यात आला. श्री इंद्रदेवजी महाराज यांचे आनंद आखाड्याच्या वतीने श्री श्री १००८ श्री विद्यावाचस्पती धर्मसम्राट पदवीदान आणि तसेच श्री मंहत स्वामी इंद्रदेवेश्वरानंद महाराज असे नामाभिदान करण्यात आले आहे. श्री इंद्रदेव महाराज मथुरा निवासी असून, प्रसिद्ध भागवत कथाकार आहेत. त्यांचा नाशिक येथे पदवीदान समारंभ होणार होता; परंतु पुन्हा एकदा शैव -वैष्णव वाद निर्माण होण्याची शक्यता झाली. शेवटी सर्व तयारी करून देखील नाशिक येथील कार्यक्र म रद्द झाला. इंद्रदेव महाराज यांचे हजारो भक्त आहेत. कथेच्या माध्यमातून त्यांचा भक्त परिवार मोठा आहे. आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती यांचादेखील शिष्य आणि भक्त परिवार देशातभरात विस्तारलेला आहे. सर्वांच्या इच्छेखातर त्र्यंबक येथे दुपारी कार्यक्रम संपन्न झाला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज आणि आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, गणेशानंद महाराज, साध्वी शिवाणी दुर्गा, रवींद्रपुरी महाराज, डॉ. बिंदूजी महाराज आदिंसह आनंद आणि निरंजनी या दोन्ही आखाड्यांचे रमता पंच सर्व शैव आखाड्यांचे प्रतिनिधी व हजारो भक्त उपस्थित होते.माधव महाराज राठी यांनी सूत्रसंचालन, तर समीर पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन भक्तिगितांनी सर्वांना मोहून टाकले. (वार्ताहर)