शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वेळेवरून वाद सुरूच

By admin | Updated: September 17, 2015 00:05 IST

तिहेरी त्रांगडे : परप्रांतीय भाविकांत नाराजी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या पार्श्वभूमीवर दररोज हजारो भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी होत असताना मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे भाविक व व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचले असून, धक्काबुक्की व लोटालोटीचे प्रकार घडून वातावरण कलुषित होत आहे. मंदिर व्यवस्थापन, पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासन या तिघांच्या तीन भूमिका असल्यामुळे तासन् तास रांगेत उभे राहूनही भाविकांना दर्शन न घेता माघारी परतावे लागत आहे. कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीच्या आदल्या दिवसापासूनच त्र्यंबकेश्वरला लाखो भाविकांची गर्दी होत असून, शेवटची शाही पर्वणी २५ सप्टेंबर रोजी असल्याने तत्पूर्वीच त्र्यंबकेश्वरला भेट देऊन कुशावर्तात स्रान व त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल आहे. दुपारपासूनच दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर ध्वनिक्षेपकावरून भाविकांना रांगेत उभे न राहण्याच्या सूचना दिल्या जात असून, त्यासाठी रात्री आठ वाजता मंदिर बंद होणार असल्याचे कारण पुढे केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिर बंद होण्याची सूचना पोलिसांकडून केली जात असून, त्याची साधी कल्पना मंदिर व्यवस्थापन वा विश्वस्तांना नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून भाविकांना दर्शनासाठी मज्जाव करणाऱ्या पोलिसांच्या कृतीविषयी विश्वस्त मंडळाच्या सदस्यांकडे भाविकांनी तक्रार केली असता त्यांनीही याबाबत अनभिज्ञता दर्शविली. श्रीमती ललिता शिंदे यांनी भाविकांच्या होणाऱ्या छळाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यास हरकत नसल्याचे आश्वासन त्यांना दिले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पोलीस जुमानत नसून विश्वस्त मंडळाचीही आडमुठेपणाची भूमिका आहे. परिणामी चार ते पाच तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शन न घेताच, परतावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबक भेटीवर येऊन गेलेले आरोग्यमंत्री दीपक केसकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून, त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणी करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचाच भाग म्हणून की काय नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांना या वादात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. देशभरातून येणाऱ्या भाविकांना कुशावर्ताबरोबरच श्री त्र्यंबकेश्वर भगवानच्या दर्शनाची आस लागून असताना, त्यांना दर्शन नाकारून प्रशासन त्र्यंबकेश्वरमध्ये उगीचच गर्दी वाढवत असल्याचा आरोपही केला जात आहे. मंदिर व्यवस्थापन व पोलीस यांच्या या कृतीमुळे स्थानिक ग्रामस्थही नाराज झाले आहेत.