शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकच्या सुरक्षारक्षकास जवानाकडून मारहाण

By admin | Updated: November 6, 2016 23:27 IST

दर्शनावरून वाद : परस्परविरोधी तक्रारी

त्र्यंबकेश्वर : सैन्य दलातील जवान असून, ओळखपत्र दाखवूनही मंदिरात दर्शनासाठी सोडत नसल्याचा राग आल्याने जवान सुनीलकुमार नेमिचंद आनू (२८), रा. सिकर (राजस्थान) याने हातात असलेले हेल्मेट सुरक्षारक्षकाच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सध्या उत्तर महादरवाजाने प्रवेश दिला जात असून , गर्दीमुळे दर्शन रांग थेट आंबेडकर चौकात जात आहे. अशा परिस्थितीत जवान आनू आपले वडील व आई यांच्यासह मला आत सोडा अशी विनंती करीत होता. तर रांगेतील अन्य लोक आरडाओरडा करतील म्हणून सुरक्षारक्षक आत सोडीत नव्हते. यात हुज्जत झाली. बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. यावेळी योगेश हा सुरक्षारक्षक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला धावला आणि तो भांडण सोडवित असता वरील प्रकार घडला. त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात योगेशवर प्राथमिक उपचार करून त्यास अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तत्पूर्वी त्याने व इतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदविली आहे. आपणास व वृद्ध आई-वडिलास देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असून, उजव्या हातास दुखापत झाली असल्याची क्रॉस फिर्याद सुनीलकुमार या जवानाने त्र्यंबक पोलीस ठाण्यात केली आहे. त्र्यंबकच्या पोलिस ठाण्यात हा वाद सुरू असतानाच एक मारुती व्हॅन पोलीस ठाण्याच्या आत वेगातच येऊन थांबली. आतील स्त्री-पुरुषांचा ताफा तावातावाने पोलीस ठाण्यात येऊन एकच गोंधळ केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यांना शांत केले. त्र्यंबक पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)