शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक ग्रामीण रु ग्णालयात तोडफोड

By admin | Updated: April 12, 2017 00:51 IST

बालकाचा अपघाती मृत्यू : कारसह चालक फरार

त्र्यंबकेश्वर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे फाट्यावर रस्ता ओलांडणाऱ्या बालकास कारने दिलेल्या धडकेने तो जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या जमावाने ग्रामीण रु ग्णालयात तोडफोड केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.खंबाळे येथील कचरे कुटुंबीय हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी येथे दर्शनार्थ गेले होते. ते परतताना सव्वाचार वाजता खंबाळे फाट्यावर उतरले. उतरल्यानंतर ते व अन्य लोक घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कारने अविनाश संजय कचरे (८) या बालकाला धडक दिली. त्यात बालकाचा जागीच मृत्यू ओढवला. धडकेनंतर कारचालकाने बालकाला त्याच्या नातेवाईकांसह त्र्यंबकेश्वर येथे आणले. मात्र त्यांना शासकीय रु ग्णालयात नेण्याऐवजी डॉ. रोहीत शेजवळ यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. यावेळी कार चालक गाडी लावण्याच्या बहाण्याने फरार झाला. दुर्दैवाने कारचा क्रमांक कुणीही घेतला नव्हता. दरम्यान डॉ.शेजवळ यांनी मुलाला सरकारी रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर मृतदेह घेऊन नातलग सरकारी रु ग्णालयात पोहोचले असता वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र दुसाने यांनी बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. एकुलता एक मुलाचा अपघाती अंत झाल्याने व संशयितही फरार असल्याने मृताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत फरार चालक व कारचा शोध लावण्यात येत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. संतप्त जमावाने ग्रामीण रु ग्णालयात तोडफोडही केली. शिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन देखील केल्याने वाहनांची रांग लागली होती. घटनेचे वृत्त कळताच पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. काही वेळाने जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना यश आले. (वार्ताहर)