शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला उभारावा खत प्रकल्प

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

गोदावरी प्रदूषण : हरित न्यायाधिकरणाने दिले आदेश

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी पूजाविधीचे निरुपयोगी साहित्य तसेच निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारावा व तोपर्यंत तेथील कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात पाठविण्याचे आदेश पुणे येथील हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीवरील कॉँक्रीटचा स्लॅब काढण्याच्या मागणीसाठी येथील ललिता शिंदे, राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांनी पुण्याच्या न्यायाधिकरणात याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणीच्या दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीचे वापरलेले साहित्य तसेच निर्माल्य नदीपात्रात जात असल्याने त्यावर नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी घ्यावी अशा सूचना यापूर्वी न्यायाधिकरणाने दिल्या होत्या; मात्र महापालिकेने त्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिकरणाने त्र्यंबकेश्वर येथेच कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. कचऱ्याचे वहन आणि अन्य खर्च येथील पुरोहित संघाकडून घ्यावा आणि त्यांनी टाळल्यास त्यांना शासकीय जागेचा धार्मिक विधीसाठी वापर करण्यास मनाई करता येऊ शकते, असेही न्यायाधिकरणाने सांगितल्याचे याचिकाकर्ता पंडित यांनी सांगितले. त्र्यंबक पालिकेला प्रकल्प राबविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार करता तोपर्यंंत हा कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी द्यावा, असेही न्यायाधिकरणाने आदेश दिले आहेत. यासंदर्भातील पूर्तता अहवाल सादर करण्यासही नगरपालिकेस सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॉँक्रिटीकरणाचा मूळ मुद्दा अद्याप बाकी असून, त्यावर पुढील तारखेस सुनावणी होणार आहे.