शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी गिरविणार गुणवत्तेचे धडे

By admin | Updated: March 25, 2017 22:54 IST

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे.

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे. यातूनच मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडू शकतो. दर्जेदार काम करणाऱ्या गुणवत्तापूर्ण कामगारांचे निर्माण शक्य आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.पंतप्रधानांच्या कौशल्य विकास कार्यक्र माची सर्वप्रथम अंमलबजावणी इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने केली. मोठा रोजगार निर्माण होण्यासाठी फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईला शासन, कंपनी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था इगतपुरी यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक धोरणात एकीकडे बदल होत असतानाच कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. राज्याने कामगार क्षेत्रात नवनवे बदल स्वीकारण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. वाढलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी इगतपुरी महिंद्रा कंपनीचा कौशल्य विकास कार्यक्रम दूरदृष्टीने उपयुक्त ठरेल. मंत्रालयात इगतपुरीची महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र शासन आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्यात या विषयावर दीर्घ बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी योगेश पाटील, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय कालरा, विजय नायर, हिरामण आहेर, इगतपुरीच्या नासीर देशमुख, नितीन देशपांडे यांच्या समवेत विविध पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारइगतपुरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे तज्ज्ञ अभियंते या विद्यार्थ्यांना धडे देतील. या विद्यार्थ्यांना नवनवे तंत्र विकसित करण्यासाठी महिंद्रा कंपनीत विविध प्रात्यक्षिके करायला मिळतील. यातून गुणात्मक विद्यार्थी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. आदिवासी भागात जि.प. शाळांना ई-प्रोजेक्टर देणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, रक्तदान, दंत चिकित्सा ,नेत्र तपासणी शिबिर, आदिवासी युवकांना तंत्रशिक्षण देणे, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, गरोदर महिलांना मार्गदर्शन,अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.