शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूल गटात तिरंगी लढत

By admin | Updated: February 14, 2017 00:29 IST

लक्षवेधी : येवला तालुक्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

 प्रकाश साबरे अंदरसूलयेवला तालुक्यातील अंदरसूल गट आतापर्यंत नेहमीच निर्णायक भूमिका घेणारा गट म्हणून ओळखला जातो. या गटात शिवसेनेचे मकरंद सोनवणे, राष्ट्रवादीचे महेंद्रकुमार काले, भाजपाचे बाबासाहेब डमाळे व काँग्रेसचे रावसाहेब लासुरे हे सर्व मिनी मंत्रालयात जाण्यासाठी नशीब आजमावत आहेत. गटातील अंदरसूल गणातून पंचायत समितीसाठी शिवसेनेच्या वतीने अंदरसूल येथील नम्रता जगताप, राष्ट्रवादीकडून अंदरसूलच्या स्वाती सोनवणे, भाजपाच्या वतीने सखाहरी लासुरे, काँग्रेसच्या वतीने शिवाजी धनगे रिंगणात आहेत. गटातील नागडे गणात शिवसेनेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, भाजपाच्या वतीने दादाभाऊ मोरे, राष्ट्रवादीकडून भारती सोनवणे, काँग्रेसकडून मीरा माळी रिंगणात आहेत. गटात अटी-तटीच्या व तुल्यबळ लढती रंगणार असल्याने या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील प्रमुख चार नेत्यांपैकी माजी आमदार मारुतीराव पवार व नरेंद्र दराडे यांनी धनुष्यबाण उचलले असून, अंबादास बनकर व अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सांभाळले आहे. मात्र तिकीट वाटपात बनकर व पाटील यांचा प्रभाव जाणवतो. शिवसेनेचे माजी आमदार कल्याराव पाटील यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. अंदरसूल गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र भुजबळ समर्थकांतील अंतर्गत गटबाजींमुळे बंडाळी दिसून येते आहे.