शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कॅम्पससाठी जागेचे हस्तांतरण

By admin | Updated: May 24, 2014 01:12 IST

६३ एकर जागा : पुणे विद्यापीठाचे उपविभागीय केंद्र दृष्टिपथात

६३ एकर जागा : पुणे विद्यापीठाचे उपविभागीय केंद्र दृष्टिपथातनाशिक : पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पससाठी शासनाने दिंडोरीजवळील सुमारे ६३ एकर जागा हस्तांतरित केल्याचे पत्र पुणे विद्यापीठाला दिले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यापीठाचे नाशिक उपविभागीय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता नाशिकच्या लाखो विद्यार्थ्यांची सोय होणार असून, त्यांना आता पुणे येथे जाण्याची आवश्यकता राहाणार नाही. दरम्यान, विद्यापीठाने यापूर्वीच शासनाला १६५ कोटींचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. पुणे विद्यापीठाचे विभाजन करून नाशिक आणि नगरला विद्यापीठाचे उपकेंद्र करण्यात यावे असा ठराव पुणे विद्यापीठाने केला होता. त्यासाठी नाशिक आणि नगर येथे जागेचा शोध सुरू होता. नगर येथील जागेचा प्रश्न निकाली निघाला असताना नाशिकच्या जागेचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. शासानाची जागा मिळण्यास निर्माण होणारी अडचण आणि ग्रामस्थांच्या अटी यामुळे जागेचा प्रश्न रखडला होता. सिद्धपिंप्री येथील जागेचा प्रश्न बारगळल्यानंतर दिंडोरी येथील आंबेदिंडोरी परिसरातील जमीन निश्चित करण्यात आली होती. या जमिनीसाठी एनओसी मिळावी यासाठी नाशिकचे सिनेट सदस्य, शिक्षक आमदार, तसेच नाशिकच्या आमदारांसह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीदेखील प्रयत्न केले होते. महसूल विभागाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. सिनेट सदस्यांनी गावात जाऊन तेथील सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील तसेच मान्यवर गावकर्‍यांशी चर्चा करून ग्रामसभेचा ठराव मंजूर करून घेत तो शासनाकडे पाठविला होता. त्यामुळे जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इतर सोपस्कर पार पाडून शासनाने ६३ एकर जमीन विद्यापीठाला विनामूल्य हस्तांतरित करीत असल्याचे पत्र धाडले. त्यामुळे आता विद्यापीठाचे उपविभागीय केंद्र लवकरच कार्यान्वित होण्याचा मार्ग मेाकळा झाला आहे. सामूहिक प्रयत्नांना यशनाशिक उपकेंद्रासाठी जागा मिळावी यासाठी सिनेट सदस्य, आमदार तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याबरोबरच दिंडोरी ग्रामपंचायत तसेच असंख्य लोकांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच जागा मिळाली आहे. मनविसेचेही प्रयत्न महत्त्वाचे ठरले. पालकमंत्री, महसूलमंत्री, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्वाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. नाशिकला औद्यगिक वसाहत असल्याने वाणिज्य, व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी शाखांच्या विस्तारासाठी प्रथम प्राधान्य देणार आहोत. - प्रा. हरिष आडके, सिनेट सदस्य, पुणे विद्यपीठ