शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रशिक्षण : मविप्रच्या मैदानावर होणार योगदिन

By admin | Updated: June 18, 2015 23:50 IST

विद्यार्थी गिरविणार योगाचे ‘धडे’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थी सकाळी शाळेत योगाचे धडे गिरवणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील क्रीडा व योग शिक्षकांना १८ व १९ जून रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.२० जून रोजी विद्यार्थ्यांचा शालेय स्तरावर याच योग शिक्षकांकडून सराव करून घेतला जाणार आहे. २१ जून रोजी जिल्ह्यात सर्व शालेय स्तरावर स. ७ ते ७.३३ या वेळेतच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत शालेय स्तरावर पोहचविण्यात आलेले आहे. या स्पर्धा २१ जून रोजीच योग दिनाचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर शालेय-स्तरावरच घेण्यात याव्यात. या कार्यक्रमाचे फोटो, वर्तमानपत्राची कात्रणे व संपूर्ण कार्यक्रमाचा अहवाल मुख्याध्यापकांनी, प्राचार्यांनी गट-शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवावा. गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा झाल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा. २१ जूनला जिल्हा परिषद व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा मुख्य कार्यक्रम केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७ ते ७.३३ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी व पदाधिकारी यांनी सकाळी साडेसहा वाजता मैदानावर योगा करण्यासाठी सैल पोशाख व सतरंजीसह उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)