शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: August 15, 2014 00:32 IST

काट्यामारुती चौकात वाहतुकीची कोंडी

 

पंचवटी : जुना आडगाव नाका येथील श्री काट्यामारुती चौकात वाहतुकीची कायम कोंडी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली, तरी ती चुकीची असल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. जुना आडगाव नाका चौफुलीवरून दैनंदिन शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. शाळकरी विद्यार्थी तसेच पादचाऱ्यांना या चौफुलीवरून रस्ता ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. वाहतूक शाखेच्या वतीने या चौकात वाहतूक पोलीस नेमण्यात आलेला असला, तरी कर्मचाऱ्याच्या गैरहजेरीत वाहतुकीची कोंडी होते. त्यातच सिग्नल यंत्रणा सुरू असली तरी त्याचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे सिग्नल यंत्रणा केवळ नावालाच उरली असून, सिग्नल बसविलेले असले, तरी वाहनधारक सिग्नलचा वापर करीत नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविलेली असली, तरी ती चुकीच्या पद्धतीने बसविलेली असल्याने सिग्नल यंत्रणा ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या आडगाव नाका चौफुलीवरून निमाणी बसस्थानकाकडे, हिरावाडीकडे, तसेच गणेशवाडीकडे वाहनधारक वाहने नेतात; मात्र सिग्नल यंत्रणेचा उपयोग होत नसल्याने वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीत सापडून मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र दैनंदिन बघायला मिळते. (वार्ताहर)