शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव येथे व्यापाऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By admin | Updated: April 18, 2015 23:53 IST

पिंपळगाव येथे व्यापाऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

पिंपळगाव बसवंत : येथील द्राक्ष व्यापारी मोहम्मद नाजीम राईन (४२) या व्यापाऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे.मोहम्मद नाजीम हे व्यापारी गेल्या ८५ वर्षांपासून पिंपळगाव क्षेत्रात द्राक्ष, टमाटा, बेदाणा आदीचा व्यवसाय करत असून हाडके नगर येथे स्वत:च्या बंगल्यात ४ मुल व पत्नीसह राहत आहेत. दि. ९ रोजी स्थानिक पिंपळगावातील शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी रिलायन्स पंपामागे बेदानाकरण्याच्या शेडवर जाऊन बाकी असलेले पैसे देण्याचा तगादा लावला. सदर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे पावसाने नुकसान झालेले द्राक्षबाग बेदाना करण्यासाठी घेतला होता. शेतकऱ्यांचे २० ते २२ लाख रुपये देणे बाकी होते. मात्र सदर व्यापाऱ्याचे ३० टन बेदाना हा कोल्ड स्टोअर्सला ठेवला होता. ते विक्री करून शेतकरी देणे होते. सल्फर जातीच्या बेदाण्याला सध्या १०० ते १०८ रुपयांपर्यंत बाजार भाव असून, पुढील आठवड्यात माल विक्री होणार होता. यात शेतकरीवर्ग कुठल्याही सबबीवर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्थानिक शेतकरी असल्याने त्यानी दादागिरी करून बेदाणाशेडमधून १५ टन माल उचलून नेला व सदर व्यापाऱ्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच बेदाणाशेडचेही नुकसान केले. २५ वर्षांत सदर व्यापारी व्यवस्थित राहिला असून आलेले संकट सहन न झाल्याने अखेरे विषारी औषध सेवन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. याबाबत पत्नी रोजवानो बानो यांनी पोलीस स्टेशनला दोन दिवस चकरा मारून गुन्हा नोंद करण्याबाबत विनंती केली; मात्र पोलिसांनीही सदर महिलेची कुठलीही दखल घेतली नाही. दरम्यान, ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती दिल्यावर स्थानिक पोलीस चौकशी करून गेले.पण सदर महिलेची अद्यापपर्यंत तरी तक्रार नोंदवून गेतली नाही. (वार्ताहर)