शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरनजीक ट्रकच्या धडकेने ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST

लासलगाव/विंचूर : येथून जवळच असलेल्या विष्णूनगर फाट्यावर ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात ट्रॅक्टर ...

लासलगाव/विंचूर : येथून जवळच असलेल्या विष्णूनगर फाट्यावर ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह उलटला. यात ट्रॅक्टर चालक जखमी झाला.

नाशिक औरंगाबाद महामार्गाने शिंदेवाडी, ता. सिन्नर येथील शरद घोटेकर गुरुवारी सकाळी ६.४५ वाजेदरम्यान विंचूर उपबाजार समितीकडे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १५ एचएम ३८५३) कांदे विक्रीसाठी घेऊन जात असताना विष्णूनगर फाट्याजवळ ट्रक (एमएच १८ बीजी ३२८१)ने पाठीमागून ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टरसह कांद्याने भरलेली ट्रॉली महामार्गावर उलटून ट्रॉलीतील कांदे रस्त्यावर पडले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रॅक्टर चालक जखमी झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टर रस्त्यातच पलटी झाल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती; परंतु पोलिसांनी घटनास्थळी येऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने कांदे दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये भरून देत वाहतूक सुरळीत केली.

--------------------

विंचूरनजीक विष्णूनगरजवळ ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात झालेला अपघातात रस्त्यावर पसरलेला कांदा.

(२६ विंचूर ॲक्सिडेंट)

260821\26nsk_1_26082021_13.jpg

२६ विंचूर ॲक्सीडेंट