शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

By admin | Updated: December 27, 2015 22:28 IST

पर्यटकांची ‘भरतपूरला’ मांदियाळी

नाशिक : चालू आठवड्यात गुरुवारपासून सलग चार दिवस सार्वजनिक सुट्या आल्यामुळे नागरिकांनी ‘वीकेण्ड’ मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान, शुक्रवारपासून नांदूरमधमेश्वर येथील राष्ट्रीय पक्षी अभयारण्यामध्ये निसर्ग पर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांनी राज्यभरातून हजेरी लावल्याने एकच झुंबड उडाली होती. दरम्यान, रविवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याने अभयारण्य हाऊसफुल्ल झाले होते. हिवाळ्याचा हा ‘वीकेण्ड’ म्हणजे वनविभागासाठी जणू पर्वणीच ठरली. तीन दिवसांमध्ये वनविभागाला सुमारे पन्नास हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी हे तर महाराष्ट्राचे भरतपूर असे गौरवोद्गार नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या बाबतीत काढले आहे. सध्या विविध देशी-परदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने अभयारण्य गजबजून गेले आहे. बोचऱ्या थंडीत बागायती शेतशिवारांची सफर व धुक्यामध्ये हरविलेले रस्ते आणि त्यामधून बाहेर पडणारे सूर्यकिरण असा गोदाकाठ पंचक्रोशी परिसराने राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी मने जिंकली आहेत.या पक्ष्यांचा किलबिलाटचित्र बलाक, रंगीत करकोचा, तलवार बदक, चक्रवाक बदक, जांभळी पाणकोंबडी, थापट्या बदक, तरंग, भुवई बदक, गढवाल, नकटा बदक, जांभळा बगळा, राखाडी बगळा, लालसरी बदक, मराल, टिबुकुली बदक, उघड्या चोचीचा करकोचा, गे्र-हेडेड फ्लायकॅचर, उघड्या चोचीचा बलाक (ओपन बिल स्टॉर्क), पांढऱ्या मानेचा करकोचा, छोटा शराटी (ग्लॉसी आयबीज), काळा शराटी (ब्लॅक आयबीज), पांढरा शराटी, चमचा बगळा (स्पूनबील), दलदल ससाणा (मार्श हॅरियर), दलदल ससाणा, टिबकेदार गरुड, ससाणा, या पक्ष्यांचे दर्शन घडत आहे.