तळवाडे दिगर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आश्रमशाळा विभाग व आदिवासी विकास विभाग यांची संयुक्त सहविचार सभा आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापराव सोनवणे होते.सभेत आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाप्रमाणे शिक्षण विभाग स्वतंत्र करावा, वर्ग-४ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ द्यावा, अपर आयुक्त कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या सर्व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना एकच भविष्यनिर्वाह निधीचा नंबर द्यावा. डीसीपीएस तसेच जीपीएफ हिशोबाची प्रक्रिया आॅनलाइन व्हावी, अधीक्षिका पदासाठी एएनएम अर्हताधारक स्त्री उमेदवारांची नियुक्तीस मान्यता द्यावी, प्रलंबित फरकाचे बिल तत्काळ अदा करावीत. कॅशलेस योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले द्यावीत आदि मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.याप्रसंगी विभागाकडून सहआयुक्त एम.जी. गायकवाड, वित्तविभाग प्रमुख विजयकुमार सोनवणे, कार्यासन अधिकारी भालचंद्र बोऱ्हाडे तर संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुन सावंत, कार्यवाह ंिवनोद हिरे, जिल्हाध्यक्ष नंदलाल ठाकरे, उपजिल्हाध्यक्ष पी. एन. अहिरे, आर. जी. खैरनार, महेश देवरे, एस. आर. चिंचोरे, उमेश खैरनार, नीलेश बच्छाव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)चांदवडला मोफत मधुमेह उपचार शिबिर चांदवड : येथील श्रीमती के.बी.आबड होमीओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रीमान आर. पी. चोरडिया हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. २०) मोफत मधुमेह व रक्तदाब निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य टी.एन.सी. नायर, डॉ. जांगडा यांनी दिली. या शिबीरात नाशिकचे मधुमेह व हदयरोग तज्ञ डॉ. शीतल कर्नावट हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तर शिबीर दरम्यान रुग्णांच्या सर्व रक्त तपासण्या केल्या जाणार आहेत. ( वार्ताहर)
.आश्रमशाळा शिक्षक परिषदेची सहविचार सभा संपन्न
By admin | Updated: December 20, 2014 00:36 IST