शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चारवर्षीय चिमुरडीवर अत्याचार

By admin | Updated: May 12, 2017 02:16 IST

नाशिकरोड : महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील फरसाण कारखान्यात कामाला असलेल्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. पीडीत बालिकेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून नराधमावर कठोर करावाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिन्नर फाटा ओढारोड येथील वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणारा सुभाष प्रकाशचंद झंवर (५१) याचा नेहे मळ्यात फरसाण बनविण्याचा कारखाना आहे. झंवर याच्या फरसाणच्या कारखान्यात नेहे मळ्यातील एक महिला कामाला असून, झंवर याने बुधवारी सायंकाळी सदरील महिलेस कामावर बोलावून घेतले होते. महिला कारखान्यावर आली असता संशयित झंवर तिला काम सांगून कारखान्याबाहेर पडला आणि सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या चार वर्षांच्या मुलीला आइस्क्रीम खाऊ घालण्याचा बहाणा करून आपल्या सोबत घरी घेऊन गेला. तेथे नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने बालिकेला तिच्या आईकडे सोडले. तेव्हापासून रडणारी चिमुरडी घरी गेल्यानंतर चक्कर येऊन पडली. तेव्हा तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली. घटनेनंतर कुटुंबीयांनी बालिकेला घेऊन झंवर यास जाब विचारला असता त्याने घाईत असल्याचे कारण सांगून तो तेथून निघून गेला. त्यानंतर बालिकेच्या कुटुंबियांनी तिला बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्या अंगावर ठिकठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा तसेच अतिप्रसंग करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर निंदनीय प्रकार नेहे मळ्यातील रहिवाशांना समजताच त्यांनी बिटको रुग्णालयात धाव घेतली.दरम्यान, इतका वेळ पीडित बालिकेच्या कुटुंबियांसमवेतच रुग्णालयात आलेल्या झवर याने बिटको रुग्णालयातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. सदर बाब जमलेल्यांच्या लक्षात आल्यानंतर नराधम झंवर यास संतप्त नागरिकांनी बिटको चौकात गाठून बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुभाष झवर हा मारहाणीत जखमी झाल्याने त्यास बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.