शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आज महासभा : गटनेत्यांकडून अद्याप नावे नाहीत

By admin | Updated: August 17, 2015 01:18 IST

महिला बालकल्याण समिती; नियुक्तीबाबत अनुत्साह

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांची निवड सोमवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत केली जाणार आहे; परंतु अद्याप गटनेत्यांकडून आपापल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे गेलेली नसल्याने समितीवर जाण्याबाबत एकूणच अनुत्साह दिसून येत आहे. दरम्यान, सोमवारी होणारी महासभा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहून तहकूब केली जाण्याची शक्यता असल्याने समिती सदस्यांची नियुक्तीही लांबणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची नियुक्ती सोमवारी महासभेत महापौरांकडून केली जाणार आहे. त्यासाठी महापौरांनी शनिवारी गटनेत्यांची बैठक बोलाविली; परंतु नंतर ती रद्द झाली. समितीवर मनसे - ३, राष्ट्रवादी - २, शिवसेना - २, भाजपा - १ आणि कॉँग्रेस - १ असे पक्षीय बलाबल आहे. महिला व बालकल्याण समितीमार्फत ४१९ अंगणवाड्या चालविल्या जातात आणि अंगणवाडीतील बालकांना सकस आहार पुरविण्यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. याशिवाय महिला व मुलींना स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली जातात. महिला व बालकांच्या योजनांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या वार्षिक महसुली उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या ५ टक्के निधी राखून ठेवला जातो; परंतु गेल्या काही वर्षांपासून निधीअभावी समितीची परवड होऊ लागल्याने आणि समिती केवळ कागदावरच उरल्याने समितीवर जाण्यासाठी महिला सदस्य अनुत्सुक असतात. समितीच्या सभापतींना गाडी व दालन उपलब्ध होत असल्याने अनेकांना केवळ सभापतिपद भूषविण्यातच रस असतो. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांत समितीच्या सभांमध्ये विषयपत्रिकेवर विषयच येत नसल्याने कामकाज थंडावलेले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत महापौरांकडे गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे सुचविलेली नव्हती. महासभा तहकूबच होणार असल्याने वरिष्ठांशी विचारविनिमय करून नंतर नावे पाठविली जातील, अशी भूमिका गटनेत्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)