शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर, हरणबारीच्या पाण्याचा आज फैसला

By admin | Updated: November 30, 2015 23:45 IST

बैठक : पाणी देण्यास पाटबंधारे अनुत्सुक

नाशिक : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जळगाव शहरासाठी चणकापूर, हरणबारीसह चार धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मंगळवारी मुंबईत बैठक होत असून, या धरणांमधून पाणी सोडण्यास कसमादेच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी यापूर्वीच केलेला विरोध तसेच गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जिल्ह्णात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांचा उठलेला क्षोभ लक्षात घेता खुद्द पाटबंधारे खातेच जळगावसाठी पाणी सोडण्यास अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर व पूनद या चार धरणांमधून गिरणा धरणात व तेथून जळगाव जिल्ह्णासाठी समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याबाबत मुंबईत प्राधिकरणाची बैठक होत आहे. या चारही धरणांमध्ये ४८९८ दशलक्ष घनफूट पाण्याचे यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. या चारही धरणांपैकी चणकापूरमधून मालेगाव शहर, सटाणा, रावळगाव, दाभाडी पाणीपुरवठा योजना तसेच केळझर धरणातूनही सटाणा नगरपालिका, पिंपळगाव, निकवेल पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडावे लागले. हरणबारी धरणातून मोसम नदीकाठावरील सर्व गावे तसेच पाणी योजना अवलंबून असून, पूनद धरण देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या चार तालुक्यांसाठी पाण्याची तहान भागवते. या धरणाची क्षमता व त्यात सध्या असलेला पाणीसाठा तसेच मागणी पाहता, धररातून बिगर सिंचनासाठी पाणी देणे तूर्त शक्य दिसत नाही. या उपर गिरणा धरणात १८३५ दशलक्ष धनफूट पाणी सध्या उपलब्ध असून, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या धरणाच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्णातील नांदगाव, मालेगाव येथील पाण्याचे आरक्षण अद्याप मंजूर केलेले नाही. अशा परिस्थितीत समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये गिरणा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या चणकापूर, हरणबारी, केळझर व पूनद या चार धरणांतील पाणी जळगाव जिल्ह्णासाठी सोडण्याबाबत जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, संबंधित तालुक्याचे लोकप्रतिनिधी, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)