शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानाचा आज निर्णय

By admin | Updated: October 15, 2016 02:50 IST

महापालिका : महापौरांच्या दालनात होणार बैठक

नाशिक : दिवाळीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय झाला नसल्याबद्दल महासभेत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सर्वपक्षीय गटनेते, प्रशासन आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे शनिवारी सानुग्रह अनुदानावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मनपाच्या महासभेत सुरुवातीलाच शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचा आग्रह धरला. यावेळी महापौरांनी सदर विषयावर नंतर चर्चा करू अगोदर विषयपत्रिकेनुसार कामकाज चालवू असे सांगत सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेनेचे सर्वच सदस्यांनी उभे राहून सानुग्रह अनुदानप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे महापौर व सेना नगरसेवक यांच्यात शाब्दिक बोलाचालीही झाली. कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या विषयाबाबत युनियन पदाधिकारी व प्रशासन यांच्यात चर्चा झाली असून, फक्त किती रक्कम द्यायची यावरच निर्णय बाकी असल्याचा खुलासा महापौरांनी केला. सेनेचे पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर महापौरांनी याबाबत शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता बैठक घेण्याचे जाहीर केले. यावेळी प्रकाश लोंढे यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचाही मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौरांनी ठराव मंजूर करून प्रशासनाकडे रवाना केल्याचे सांगितले.