शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीबाबत आज तोडगा?

By admin | Updated: February 10, 2016 23:26 IST

सर्वसहमतीचे प्रयत्न : आमदार, गटनेत्यांना निमंत्रण

नाशिक : जलसंपदामंत्र्यांनी महापालिकेला आणखी ३०० दलघफू पाणी वाढवून दिले असले तरी सुमारे २६ दिवस पाणी कमी पडणार असल्याने ही तूट भरून काढण्याविषयी सर्वसहमतीने निर्णय घेण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी पुढाकार घेतला असून गुरुवारी दुपारी ४ वाजता शहरातील सर्व आमदार, खासदार तसेच मनपातील गटनेते यांची महापौर दालनात बैठक बोलविण्यात आली आहे. पाणीकपातीवरून महापालिकेत सरळ सरळ दोन गट पडले असून भाजपा विरुद्ध सत्ताधारी आघाडी असे चित्र दिसून येत आहे. महासभेच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता महापालिका प्रशासनाने परस्पर छुप्या पद्धतीने ३० टक्के पाणीकपात सुरू केल्याने बुधवारी महापौर-उपमहापौरांसह गटनेत्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना धारेवर धरले होते आणि सदर वाढीव पाणीकपात मागे घेण्याचे महापौरांनी आदेशित केले होते. दरम्यान, जलसंपदामंत्र्यांनी महापालिकेला आणखी ३०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून दिले असले तरी ५ जुलैपर्यंतच पाणीसाठा पुरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुमारे २६ दिवसांची तूट कशी भरून काढायची याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झालेला आहे. पाणीप्रश्नी राजकारण न आणता यावर सर्वमान्य सर्वसहमतीने तोडगा निघावा यासाठी आता महापौर अशोक मुर्तडक यांनी शहरातील सर्व आमदार,नाशिकचे खासदार तसेच मनपातील सर्वपक्षीय गटनेते यांची गुरुवारी दुपारी ४ वाजता महापौरांच्या दालनात बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणीप्रश्नी वास्तव मांडले जाऊन नेमकी काय भूमिका घ्यायची, यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. पाणीकपातीबाबत एकदाचा सोक्षमोक्ष याच बैठकीत व्हावा, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)