शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शहरातील भाजीबाजारासाठी वेळेचे निर्बंध आजपासून शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:18 IST

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. त्यानंतर मनपाने भाजीबाजार तसेच मांसविक्रीसंदर्भातील वेळेच्या बंधनाबाबतचे आदेश मागे घेतले आहेत.

ठळक मुद्देगमे यांचे आदेश : नागरिकांच्या सोयीसाठी निर्णय

नाशिक : लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. त्यानंतर मनपाने भाजीबाजार तसेच मांसविक्रीसंदर्भातील वेळेच्या बंधनाबाबतचे आदेश मागे घेतले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे शहरात महापालिका अंमलबजावणी करणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अर्थात, सामासिक अंतरासह अन्य निर्बंध कायम राहणार असून, बाधित रुग्ण सापडलेल्या विविध भागातील पाच कन्टेमेंन्ट झोन मात्र भाजीबाजारावरील सध्याची बंधने कायम राहणार आहेत.मनपाच्या वतीने सहा विभागात खुल्या जागेतदेखील भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी सामासिक अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संचारबंदी कालावधीत दुपारी चार वाजेपर्यंत हे भाजीबाजार सुरू ठेवण्याचे निर्बंध अलीकडेच घातले होते. दोन व्यक्तींमध्ये अर्थात विक्र ेता व ग्राहक यांच्यात किमान एक मीटर अंतर राहील व दोन दुकानांमध्ये पाच मीटर अंतर, तर भाजी मार्केटमधील ओट्यांच्या ठिकाणी प्रत्येक तीन ओट्यांमधील मधला ओटा रिकामा राहील इतके अंतर सोडणे बंधनकारक करण्यात आले होते.२० एप्रिलपासून आॅरेंज आणि ग्रीन झोनबाबत नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वेळांमध्ये बदल केले असून, वेळेत शिथिलता दिली आहे. त्याच धर्तीवर आयुक्त गमे यांनी सोमवारी (दि.२०) भाजीबाजार आणि मांसविक्र ीबाबचे वेळेचे बंधन काढून घेतले आहे. अर्थात, उघड्यावरील विक्र ीवर बंधने मात्र कायम ठेवली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार