शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी पांगविणाऱ्या पोलिसांवरच दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कर्तव्यावर असताना ...

याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथे दोघा पोलिसांवर दगडफेक करून संशयित समाजकंटकांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आहेर, साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे. दोघांना उपचारासाठी देवळाली छावणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या समाजकंटकांना पांगविण्यासाठी पोलिसांना पुन्हा एकदा बळाचा वापर करत गर्दी पांगवावी लागली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त विजय खरात व सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष चंद्र देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित शंकर सुरेश देवकर, श्रावण माने, रोहित कुसमाडे, दीपक नलावडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात एकूण १४ संशयितांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजवून कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचविण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---इन्फो--

भगुरलाही हाणामारीची घटना

भगुर येथेही रात्री अकरा वाजेच्यादरम्यान गायकवाड गल्लीत सेल्फी काढताना धक्का लागल्याचा राग आल्याने दोन युवकांमध्ये वाद निर्माण झाला. एकाने धारधार वस्तू काढून दुसऱ्याच्या डोक्यावर मारली. या घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली असून संशयिताने घटनास्थळावरून पळ काढल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद होऊ शकलेली नाही.