शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ताल सप्तक आणि कथक नृत्यांच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

By admin | Updated: September 5, 2015 00:15 IST

पं. बिरजू महाराज आणि बिंदादिन महाराजांच्या रचनांचाही अंतर्भाव

नाशिक : नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे आवर्तन संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.४) आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी ताल सप्तक आणि कथक नृत्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.प्रारंभी ‘वन्दे शिवम् शंकरम्’ ह्या शिववंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तालसप्तकाचा आविष्कार सादर करताना ‘ताल’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून कीर्ती भवाळकर यांच्या दिग्दर्शनातून तालसप्तकची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. तालसप्तकाच्या सुरुवातीला दादरा तालातील ‘जादू भरेली कौन अलबेली‘ या ठुमरीने प्रेक्षकांची दाद मिळवली. यानंतर पं. बिरजू महाराज यांनी रचलेल्या ‘श्रीकृष्ण निरतत थुंग थुंगा’ ह्या रूपकाची रचना प्रस्तुत करण्यात आली. या रचनेतून श्रीकृष्ण राधेबरोबर आणि गोपिकांबरोबर गायन, वादन, नृत्य यात रंगून जायचा हे चित्र दाखविणारी रचना वैशिष्ट्यपूर्ण ठरली.यानंतर केहेरेवा तालातील ‘सजन बीना ना लागे जिया मोरा’, बिंदादिन महाराजांच्या रचनेतील ‘शाम छबी अति बनी’, एकतालातील मेघश्याम घनश्याम, घमार तालातील होरी आणि तराणा, त्रिताल आणि भैरवी रागातील ‘शिव के मन मे शरण हो’ या नृत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.समारोहाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नृत्यांगना पंडित मंजिरी देव यांच्या कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. सुरुवातीला गणेशवंदना, त्यानंतर कृष्णवंदना आणि कृष्ण भजनाच्या भावाभिनयाने प्रेक्षकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. यानंतर मंजिरी देव यांनी विलंबित ते दृत या लयींच्या विविध टप्प्यांवरील तोडे, तुकडे, ततकार यांच्या सादरीकरणासह कथकच्या बनारस घराण्याच्या बंदिशींचे सादरीकरण केले.कार्यक्रमाची सुरुवात भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, कीर्ती भवाळकर, सायली मोहाडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अरविंद भवाळकर यांनी प्रकाश योजना, रंगभूषा माणिक रानडे तर पराग जोशी यांनी ध्वनी संयोजन केले होते. सूत्रसंचालन धनेश जोशी यांनी केले.