शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रुम-ब्रुम’चा थरार : फाळके स्मारकात आज रोमांचक अनुभव

By admin | Updated: June 13, 2014 00:18 IST

‘रॅली आॅफ महाराष्ट्र’चा शुभारंभ

नाशिक : इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या महिंद्र अ‍ॅडव्हेंचर महाराष्ट्र रॅलीला आज सायंकाळी सिटी सेंटर मॉलपासून शानदार शुभारंभ झाला. नाशिककरांना सदर स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा थरार अनुभवण्याची संधी उद्या शुक्रवारी फाळके स्मारक येथे मिळणार असून, शनिवारपासून प्रत्यक्ष स्पर्धेचा थरार घोटी-सिन्नर रस्त्यावरील अवघड वळणांच्या रस्त्यावर सुरू होईल. वेस्टर्न इंडियन स्पोटर््स असोसिएशन (विसा) च्या वतीने इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचे आयोजन नाशकात करण्यात आले असून, महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रला आज शानदार शुभारंभ झाला. सिटी सेंटर मॉल येथे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंडियन रॅली चॅम्पियनशिपचा गतविजेता गौरव गिल याच्या गाडीला सरंगल यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर ठरावीक वेळेच्या अंतराने स्पर्धेतील वाहने मार्गस्थ झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्र अ‍ॅडव्हेंचरचे बिजॉय कुमार, नबेंन्दू अचारजी, रोहन अल्बेल, अविजित भट्टाचार्य, अभय आपटे, मोनीत ढवळे उपस्थित होते. रॅलीतून गाड्या सिटी सेंटर मॉल येथून सुटून एबीबी सर्कल, कॉलेजरोड, गंगापूरनाका, जुना आग्रारोड, त्र्यंबक नाका आणि परत सिटी सेंटर मॉल येथे परत आल्या. यावेळी विसाचे अश्विन पंडित, स्वाती पंडित, महिंद्र अ‍ॅडव्हेंचरचे सहकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)