तालुकानिहाय कोरोना रुग्णसंख्या
नाशिक- २३९
बागलाण- १४७
चांदवड- २४६
देवळा- ८८
दिंडोरी- २०३
इगतपुरी- ३०
कळवण- ८३
मालेगाव- १४२
नांदगाव- ११४
निफाड- ३५६
पेठ-०३
सिन्नर- ६९५
सुरगाणा-०६
त्र्यंबकेश्वर-००
येवला-५३
-------
आजवर झालेल्या चाचण्या- ३,९१,३४१
बाधित होण्याचे प्रमाण- २९.९४
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- ९७.२६
---------------
जिल्ह्यातील कोरोना लाट आता ओसरू लागली असून, कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करून त्यांनाही संसर्ग आहे किंवा नाही याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, नागरिकांमध्ये कोरोनाविषयक झालेली जागृती व आरोग्य विभागाचे परिश्रम यासाठी कारणीभूत आहेत.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
---------
अनलॉकनंतर सिन्नर, निफाडमध्ये रुग्णसंख्या अधिक
एक आठवड्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र हॉटस्पॉट असलेले सिन्नर व निफाड तालुक्यात रुग्णसंख्या अजूनही तीन अंकीच्या घरात आहे.
----------------