शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे तीन कर्मचारी बडतर्फ

By admin | Updated: July 2, 2017 01:10 IST

महापालिकेचे तीन कर्मचारी बडतर्फ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका सेवेत रुजू झाल्यानंतरही जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या बिगारी या पदावर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना प्रशासनाने बडतर्फ केले आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीने याबाबत गंभीर दखल घेतल्यानंतर महापालिकेने शनिवारी (दि.१) सायंकाळी कारवाई केली.राज्य विधिमंडळीय अनुसूचित जमाती कल्याण समिती गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. दोन दिवसांपूर्वी समितीमार्फत महापालिकेचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला असता समितीने त्याबाबत प्रशासनाला कारवाईबाबत जाब विचारला होता. शनिवारी (दि.१) पुन्हा समितीपुढे महापालिका अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. त्यानंतर मनपा प्रशासनाने जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बिगारी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई केली. प्रशासनाने सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. सदर कर्मचारी हे सन २००३ पासून महापालिका सेवेत कार्यरत होते. दरम्यान, जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करता पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १५ असून त्यांनाही येत्या १५ दिवसांत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी नोटिसा बजावल्या जाणार आहेत. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांना पदावनत केले जाणार असल्याची माहिती दिली.