शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

तीन सोनसाखळी चोरट्यांना मोक्का

By admin | Updated: February 4, 2017 23:40 IST

पहिलीच कारवाई : गुन्हे शाखेची कामगिरी; १२ गुन्ह्यांची कबुली

नाशिक : महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणे, सोन्याची चेन हिसकावून प्रसंगी दुचाकीवरून ढकलून देत जखमी करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे़ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथमच तिघा संशयितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोक्का) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ या चोरट्यांनी शहरातून १२ महिलांच्या सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली होती़  पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केलेल्या सोनसाखळी चोरट्यांमध्ये बाळू चंदर जाधव (३२, रा. शांतीनगर, अंबड), किशोर अशोक धोत्रे (२९, रा. शांतीनगर, अंबड) व विनोद गंगाराम पवार (२९, रा. भगतसिंगनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) या तिघांचा समावेश असून, हे तिघेही सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत़ न्यायालयात सुरू असलेल्या त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, शिक्षा होण्याचीही शक्यता आहे़ शहर गुन्हे शाखेने २ डिसेंबरला या तिघांना चेनस्रॅचिंगप्रकरणी अंबड पोलीस ठाणे हद्दीतून अटक केली होती़  पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता व सातपूर परिसरातून चोरलेल्या दुचाकींचा वापर चेनस्नॅचिंगसाठी केला होता़ या तिघांनी गंगापूर, अंबड, इंदिरानगर, भद्रकाली, मुंबई नाका, आडगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलांच्या गळ्यातील १२ सोनसाखळ्या खेचून नेल्या होत्या़ या तिघांकडून १२ सोनसाखळी चोरी व दोन दुचाकींच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १६ तोळे सोने, दोन दुचाकी असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)