शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींच्या खंडणीप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: August 14, 2016 02:41 IST

भद्रकाली पोलिसांची कामगिरी : कंपनीत गुंतविलेले भांडवल वसुलीसाठी केले अपहरणं

 नाशिक : गुजरातमधील गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत गुंतविलेले भांडवल व त्यावरील कमिशन मिळत नसल्याने ते वसूल करण्यासाठी कंपनीतील कमिशन एजंटला चर्चेसाठी नाशकात बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघा संशयितांच्या तावडीतून अपहृत युवकाची भद्रकाली पोलिसांनी सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शनिवारी (दि़१२) पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, या तिघा संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ उपायुक्त पाटील यांनी सांगितले की, गुजरातमधील मुकेश गणेशभाई कुकडीया (४८, रा़ गोपीनाथजीनगर, मोठा वारसा, सुरत) यांचा मुलगा दीपक कुकडीया हा जिग्नेश पानसरीया यांच्या गुजरातमधील विनटेक कंपनीत कमिशन एजंट म्हणून काम करतो़ दीपक याच्याशी ओळख झालेले संशयित ललित भानुभाई पटेल, हितेश अमृतलाल पटेल, संदीप गणेश पटेल (रा़ शंकरनगर, गंगापूररोड, नाशिक) यांनी कंपनीचे नाशिक शहरात गृहोपयोगी साहित्याचे दुकान सुरू करण्यासाठी नॉनरिफंडेबल तत्त्वावर दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली़ या गुंतवणुकीच्या बदल्यात संशयितांना कंपनीच्या वार्षिक नफ्यातून पाच टक्के कमिशन दिले जात होते़ मात्र तीन महिन्यांपासून कंपनीने संशयितांना पाच टक्के कमिशन दिले नाही़ त्यामुळे संशयित पटेल हे दीपक कुकडीया यास फोनवर धमकी देत होते़ कंपनीतील गुंतवणुकीचे पैसे परत मिळावे या मुद्द्यावरील चर्चेसाठी संशयितांनी कंपनीचे मालक जिग्नेश पानसरीया व सेल्समन दीपक कुकडीया यांना गुरुवारी (दि़११) नाशिकला बोलावून घेतले़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तपोवन रोडवरील मारुती वेफर्स येथील बैठकीनंतर संशयितांनी शस्त्राचा धाक दाखवून दीपकचे अपहरण करीत जोपर्यंत तीन कोटी रुपये परत मिळत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असे सांगून घेऊन गेले़ यानंतर मुकेश कुकडीया यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना घटनेची माहिती दिली़ त्यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष देऊन व्यूहरचना तयार केली़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, लवांड, पोलीस हवालदार सोमनाथ सातपुते, रियाज शेख, कैलास शिंदे, काळोगे, मोजाड, एजाज पठाण, संतोष उशीर, मिलिंद परदेशी, राकेश बनकर यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)