शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तीन नगरसेवकांसह माजी आमदारपुत्र रिंगणात

By admin | Updated: February 14, 2017 01:39 IST

चुरस : मतदारांकडून पक्षाऐवजी व्यक्तीला मिळेल महत्त्व

अझहर शेख : नाशिकतीन विद्यमान नगरसेवक व एक आमदारपुत्र निवडणुकीच्या रिंगणारत असलेल्या प्रभाग क्रमांक १५मध्ये ‘कांटे की टक्कर’ पहावयास मिळणार आहे. तसा प्रभागाचा इतिहास पहाता येथील जनतेने अपक्ष व सेनेच्या उमेदवारांना दोनदा आणि मनसेला एकदा प्रतिनिधित्त्वाची संधी दिली आहे. त्यामुळे या प्रभागात कोणा एका पक्षाचे वर्चस्व अद्याप दिसू शकलेले नाही.मुंबईनाका, भाभानगर, वडाळारोड, पखालरोड, काठे गल्ली, टाकळीरोड परिसर अशी मोठी व्याप्ती असलेल्या प्रभागात सध्या जोरदार लढत होणार आहे. कारण मनसेचे विद्यमान नगरसेवक गुलजार कोकणी यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच मनसेचे आमदार राहिलेले वसंत गिते यांनी भाजपात प्रवेश करून पुत्र प्रथमेशच्या हाती कमळ दिले आहे. यामुळे मनसेने गेल्या पंचवार्षिकमध्ये या प्रभागात पाडलेला प्रभाव यंदा कमी झाला असून, संदीप लेनकर यांच्या रूपाने एकमेव स्वीकृत नगरसेवक हे मनसेचे उमेदवार असून, अन्य दोन उमेदवार प्रभागात नवीन आहे. या पंचवार्षिकमध्ये पक्षाऐवजी व्यक्तीसापेक्ष निवडणुकीचे चित्र येथे पहावयास मिळू शकते. या प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून (अ) मनसेच्या विद्यमान नगरसेवक राहिलेल्या अर्चना थोरात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, त्या यंदा भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. सेनेच्या सीमा पवार व मनसेच्या लता काठे, कॉँग्रेसच्या प्रिया मुनशेट्टीवार हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहे. सर्वसाधारण खुल्या वर्गातून (ब) भाजपा, सेना, कॉँग्रेस, मनसेसह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. ‘क’मधून एकूण सहा उमेदवार रिंगणात असून, कोकणी, गिते, मराठे, लेनकर यांच्यात प्रमुख लढत या गटातून होणार आहे. सचिन काठे हे एकमेव अपक्ष उमेदवार या गटातून नशीब अजमावत आहे. या गटात दोन किंबहुना तीन विद्यमान नगरसेवक व एक आमदारपुत्र परस्परविरोधी निवडणुकीच्या रिंगणात आहे.