ही घटना गांधी नगर पाण्याच्या टाकीजवळ घडली. येथील मीरा रामा भाटी सोमवारी (दि. १) दुपारी राहत्या झोपडीत अज्ञात कारणातून गळफास घेतला. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत श्याम कुवरलाल लिव्हारे (३२, रा. मिथील प्राईड, धुव्रनगर) याने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील कडुनिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिक पुंजा गोविंद आडके (७५, रा. नानेगाव) यांनी राहत्या घरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आडके यांनी अज्ञात कारणातून विषारी द्रव्य घेतले. उपचारासाठी त्यांना सुरवातीला बिटको आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पाेलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.