शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार मतदारांनी ‘नोटा’ वापरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:44 IST

नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे.

नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे. विशेष म्हणजे नाशिक पूर्व आणि इगतपुरी मतदारसंघातून तीन हजारांपेक्षा अधिक मतदारांनी उमेदवारांना नापसंती दर्शविली. या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांनी पक्ष बदलून निवडणूक लढविल्याने चुरस निर्माण झाली होती.निवडणूक लढविणाऱ्यांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल किंवा मतदाराला तो मतदान करण्यायोग्य वाटत नसेल तर त्यांच्यासाठी ‘नोटा’ अर्थात ‘नन आॅफ द अबॉव्ह’चा पर्याय देण्यात आला आहे. ईव्हीएममध्ये सर्वांत शेवटी ‘नोटा’चे बटण देण्यात आले आहे.या निवडणुकीत सर्वच मतदार-संघातून उमेदवारांना नाकारणाºया मतदारांची संख्या २६ हजार ९४५ इतकी आहे. इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघात सर्वाधिक तीन हजार २४ मतदारांनी नोटाचे बटण दाबले. मालेगावमध्ये मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनीनोटा दाबत उमेदवारांना नाकारले. यंदा जिल्ह्यात ६२ टक्के मतदान झाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा टक्का घसण्याबरोबर ‘नोटा’ दाबण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख ४४ हजार इतकी असतानाही केवळ २८ लाख १८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर २६ हजार ९४५ मतदारांनी ‘नोटा’ दाबून नापसंती दर्शविली. सर्वाधिक नोटाचा वापर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात झाला. या ठिकाणी ३ हजार ५९ मतदारांनी नोटाचा मार्ग निवडला. मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वांत कमी १ हजार १४३ मतदारांनी नोटा दाबत उमेदवारांना नाकारले. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदान केंद्रांपर्यंत मतदार आणण्यासाठीच्या सुविधादेखील दिल्या जातात. मतदानाचे राष्टÑीय कर्तव्य बजविण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जात असली तरी नोटाचा पर्यायही समोर असल्याने अनेक मतदार नोटाचाही वापर करतात. यंदा तो अधिक करण्यात आल्याचे दिसून आले.

टॅग्स :Electionनिवडणूक