शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

देणाऱ्याचे हात हजारो....

By admin | Updated: July 15, 2016 00:24 IST

निवृत्तिनाथ पालखी : दात्यांच्या अनमोल सहकार्याने ‘वारी’ सफल

मुकुंद बाविस्कर नाशिक‘मुखाने हरिनाम बोला, पायी हळूहळू चाला’, ज्ञानदेव तुकाराम निवृत्तिनाथ महाराज की जय’ अशा टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो मैलांचे अंतर पार करीत त्र्यंबकहून निघालेली संत निवृत्तिनाथ पालखी आणि त्यासोबतच्या दिंंड्या पंढरपूरनजीक दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तिनाथांची मुख्य पालखी आणि त्यासोबत सुमारे ७० हजार वारकरी असलेला ३५ दिंड्यांचा हा ताफा दरकोस दर मुक्काम करीत विठूमाउलीच्या दर्शनासाठी झाला खरा, परंतु त्यासाठी केवळ वारकऱ्यांंचेच नव्हे तर दानशूरांचेही पालखी प्रवास यशस्वी करण्यात मोठे योगदान आहे.आषाढी एकादशीला त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला पालखी नेण्याची परंपरा साधारणत: १२५ वर्षांपासून म्हणजे ६ जुलै १८८५ पासून अव्याहतपणे सुरू आहे. पूर्वी हा प्रवास ३० दिवसांचा होता, आता २१ दिवसांचा असतो. अवघ्या तीन आठवड्यांत पंढरपूर गाठावे लागते. पुढे यात अनेक दिंड्या सामील होतात. वारकऱ्यांचा एवढा मोठा ताफा नेणे सोपे नसते. त्यांच्या भोजनापासून मुलभूत सुविधांपर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा देणे आवश्यक असते. अर्थातच त्यासाठी विठूभक्त दानशूरांची भूमिका अत्यंत मोलाची असते. यासंबंधी माहिती देताना संत निवृत्तिनाथ पालखी ट्रस्टचे व्यवस्थापक पुंडलीकराव थेटे यांनी सांगितले की,वारकऱ्यांना सर्वप्रकारच्या सुविधा राज्यशासन जिल्हा परिषद, स्वंयसेवी संस्था व सेवाभावी सदभक्तांकडून प्राप्त झाल्याने ही पदयात्रा अत्यंत सफल झाली आहे. विशेष म्हणजे अनेक दानशूर भाविकांनी वारकऱ्यासाठी पाणी, शिधा, औषधी, उबदाार कपडे आदि सााहित्य पुरवून आपले नाव जाहीर केले नाही. त्यामुळे कोणत्या दिंडीसाठी कुठून मदत झाली हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु मदतीचे हजारो हात पुढे आल्यानेच २४ मुक्कामात सुमारे ३५५ कि.मी.च्या मार्गात कुठेही गैरसोय झाली नाही, असेही ते म्हणाले.