--
इन्फो-पॉइंटर
शहरातील महाविद्यालये -६०
शहरातील अकरावीच्या जागा - २७.२७०
---
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय
तंत्रनिकेतन व आयटीआयमध्ये दहावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे दहावीच्या मूल्यमापनावरच तंत्रशिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया ठरणार आहे. त्यामुळे आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया की, इयत्ता नववीच्या गुणांवर प्रवेश याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची सध्या चर्चा सुरू असल्याचे समजते.
--
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार!
दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शाळांनी घेतलेल्या पूर्व परीक्षा, तोंडी परीक्षांच्या आधारावर मूल्यमापण होण्याची शक्यता आहे; मात्र अद्याप अंतर्गत मूल्यमापनाविषयी शासनस्तरावरून कोणतीही स्पष्टता नसल्याने याविषयी अजूनही संभ्रम कायम आहे.
--
सीईटी ऑनलाइन झाली तर ग्रामीण भागाचे काय?
सीईटी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा निर्णय झाला, तर ही परीक्षा शहरातच घेणे शक्य आहे; मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या अडचणींमुळे परीक्षा देण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात डीजिटल परीक्षा केंद्र उपलब्ध होणेही कठीण आहे. त्यामुळे ऑनलाइन सीईटी झाली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी कोरोनाचा अडसर आहे.
----
शिक्षक, प्राचार्य म्हणतात ...
अकरावी प्रवेशाच्या विषयावर पालक, शिक्षक, प्राचार्य यांचे ऑनलाइन चर्चासत्र घेऊन याविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यातून निष्कर्ष काढून त्यानुसार कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
-प्रा. संजय शिंदे, अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.
--
विद्यार्थी, मुख्याध्यापक
दहावीतील अकरावी प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या सीईटी अथवा अन्य पर्यायांऐवजी सर्व विद्यार्थ्यांना आहे, त्याच उच्च माध्यमिक विद्यालयात अथवा कनिष्ठ महाविद्यालयात थेट अकरावीत प्रवेशित करणे अधिक सोयीचे आहे. ज्या शाळांमध्ये उच्च माध्यमिकचे वर्ग नाहीत, अशा विद्यार्थ्यांना जवळच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश द्यायला हवेत.
- अलका दुनबळे , प्राचार्य, के. जे. महेता, कनिष्ठ महाविद्यालय, नाशिकरोड.
----
दहावीच्या विद्यार्थ्यांची सीईटी घेण्याचा पर्याय आहे; परंतु विद्यार्थ्यांचा पुस्तकाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ते या परीक्षेशी समरस होऊ शकतील का, याविषयी साशंकता आहे. ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे कठीण आहे. त्यामुळे नववीच्या प्रथम सत्रातील ८० टक्के व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुणांची सरासरी काढून तयार झालेल्या गुणपत्रकांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविता येईल.
-गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक मराठा हायस्कूल, नाशिक.