शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६ गावे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:00 IST

नाशिक : जिल्ह्यात पाऊस पडूनही चार तालुक्यांतील ३६ गावे तहानलेली असून, त्यासाठी तेरा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी मात्र जुलै महिन्यातच जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने टॅँकर बंद करण्यात आले होते. उन्हाळ्यात भेडसावणाºया पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी यंदा फेब्रुवारीपासूनच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मार्च महिन्यापासून टॅँकरच्या ...

नाशिक : जिल्ह्यात पाऊस पडूनही चार तालुक्यांतील ३६ गावे तहानलेली असून, त्यासाठी तेरा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी मात्र जुलै महिन्यातच जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने टॅँकर बंद करण्यात आले होते. उन्हाळ्यात भेडसावणाºया पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी यंदा फेब्रुवारीपासूनच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मार्च महिन्यापासून टॅँकरच्या संख्येत वाढ झाली. शासनाने प्रारंभी जूनअखेर टॅँकर सुरू करण्यास अनुमती दिली, मात्र जिल्ह्णात जूनमध्ये पावसाला जरी सुरुवात झाली असली तरी, पूर्व भागातील सहा तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे नांदगाव, मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई कायम होती. परिणामी ३० जूननंतरही टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकर सुरू ठेवण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला परंतु मालेगाव, सिन्नर, नांदगाव व बागलाण या चार तालुक्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या गावांमध्ये टंचाई होती तेथे टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही. दरम्यान, प्रशासनाने संबंधित प्रांतांना पाणीटंचाईची खात्री करण्याच्या सूचना करून तसा अहवाल मागविला व त्यानुसारच टॅँकर सुरू ठेवण्यास परवानगी दिली.सध्या जिल्ह्णातील मालेगाव, नांदगाव, बागलाण व सिन्नर या चार तालुक्यामध्ये अद्यापही ३६ गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. त्यासाठी १३ टॅँकर सुरू करण्यात आले असून, सर्वाधिक आठ टॅँकर बागलाण तालुक्यात आहेत. तर सिन्नरला तीन व नांदगाव, मालेगावी प्रत्येकी एक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी जुलैअखेर जिल्ह्णातील सर्व टॅँकर बंद करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी जिल्ह्णात सर्वदूर पाऊस होऊनही टंचाईग्रस्त गावांचा पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही.