शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: July 5, 2017 01:06 IST

नाशिक : विविध ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे़ याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़विवाह समारंभास निफाडला जाणाऱ्या दाम्पत्याचे सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकावर घडली़ अरुणा खरोटे (४५, रा़ब्रह्मपुत्रा सोसायटी, भगवंतनगर, मुंबईनाका) व त्यांचे पती बाळासाहेब खरोटे यांना निफाडला विवाहसमारंभासाठी जायचे असल्याने ते ठक्कर बाजार बसस्थानकावर आले़ औरंगाबाद बसमध्ये बसवाहकाच्या सीटच्या पाठीमागे बसलेल्या या दाम्पत्याचे चोरट्यांनी ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ३२ ग्रॅम वजनाची पट्टीची पोत, ७ ग्रॅमचे कानातले झुबे व वेल, पाच साड्या, कपडे व निळी बॅग चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीची दुसरी घटना गंगापूररोडवरील सिरीन मेडोजजवळील साळवे मळ्यात घडली़ २६ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास उर्मिला आळणे ही युवती घरासमोर फोनवर बोलत होती़ त्यावेळी अ‍ॅव्हेंजर दुचाकीवर आलेल्या संशयिताने त्यांच्या वीस हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़, तर चोरीची तिसरी घटना जिल्हा परिषद कार्यालयाच्या पार्किंगमध्ये घडली़ गंगापूररोड परिसरातील रहिवासी आप्पासाहेब दराडे यांनी आपली इनोव्हा कार (एमएच १५, एम ००१५) सोमवारी (दि़३) पार्किंगमध्ये लावली होती़ या कारमधील बॅगमधून चोरट्यांनी चार हजारांची रोकड, विविध बँकांचे धनादेश, पासबुक चोरून नेले़