येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, प्रदीपकुमार जाधव, शशिकांत शिंदे उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, मन, शरीर व आचरणाचे पावित्र्य ठेवणारा रमजान महिना आहे. पोलीस रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करीत आहे. मुस्लीम बांधवांनी शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करून रमजान ईद व महिना साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी म्हणाले, कोरोनाचे नियमांचे पालन करून रमजान ईद साजरी करावी. घरातच नमाज पठण करावे, अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात कोरोना नियंत्रणात आहे. जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन खांडवी यांनी केले. यावेळी अरशद मिनानगरी, हाजी गुलाब पहिलवान, केवळ हिरे, युसुफ इलियास, फिरोज आझमी, मौलाना हमीद अजहरी, प्रमोद शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. माैलाना हमीद अजहरी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले, तसेच मान्यवरांनी रमजानच्या खरेदीसाठी १० दिवस दुकाने खुली करण्यास मुभा द्यावी. रमजानची नमाज मैदानावर अदा करण्यास परवानगी देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. बैठकीला शांतता व एकात्मता समितीचे सदस्य, प्रभारी पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो
दुकाने उघडण्याची मागणी
शांतता समितीच्या बैठकीत मान्यवरांनी खरेदीसाठी दुकाने उघडणे, मोकळ्या मैदानावर नमाज अदा करणे, याबाबत परवानगीची मागणी केली. या सूचना शासन स्तरावर पाठविण्यात येथील. शासनाने निर्णय दिल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले.
फोटो फाईल नेम : ०४ एमएमएवाय ०१ . जेपीजी
मालेगावी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील. समवेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे, प्रदीपकुमार जाधव, शशिकांत शिंदे आदी.
===Photopath===
040521\04nsk_6_04052021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.