शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

चोरीच्या कार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: June 19, 2015 00:08 IST

बारा कार्स जप्त : युनिट-३ ची कामगिरी; मुंबई, पुण्यातून चोरी

नाशिकरोड : मुंबई-ठाणे-पुणे आदि भागांतून चार चाकी महागड्या गाड्या चोरणाऱ्या टोळीचा नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट-३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. वाहनचोरीच्या टोळीचा मुंबई कांदवलीतील एका म्होरक्याकडून ५३ लाख रुपये किमतीच्या एकूण १२ चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.मुंबई-ठाणे-पुणे आदि भागांतून महागड्या चारचाकी गाड्या चोरून बनावट आरसी बुक (स्मार्ट कार्ड) बनवुन त्या चोरीच्या गाड्या कमीत कमी किमतीत विकल्या जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट-३ चे पोलीस निरीक्षक संजय सानप, हवालदार जाकीर शेख यांना मिळाली. त्यानुसार वाहनचोर टोळीची अधिक माहिती मिळवून सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोंधे, कर्मचारी सुभाष गुंजाळ, संजय मुळक, विलास गांगुर्डे, मोहन देशमुख, इरफान शेख, शांताराम महाले, संतोष कोरडे, राजेंद्र जाधव, दीपक जठार, गंगाधर केदार, आत्माराम रेवगडे यांनी चार दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील दहीसर येथील काशमीरा परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचलेल्या पोलीस पथकाने संशयित दिवाकर शेष आण्णा शेट्टी (वय ४८, रा. कांदीवली, मुंबई) यास ताब्यात घेतले. संशयित दिवाकर शेट्टी याच्याकडून प्रारंभी पाच चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.संशयित शेट्टी याची पोलिस कोठीत पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडून मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली, नाशिक येथून चोरलेल्या ५३ लाख रुपये किंमतीच्या ४ इनोव्हा, ३ तवेरा, १ बोलेरो, १ इंडिगो, १ महिंद्रा पिक अप, १ हुंडाई वरणा, १ सेंन्ट्रो अशा एकूण १२ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)