शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाचशे कोटींच्या ठेवी मोडणार

By admin | Updated: April 12, 2017 00:42 IST

जिल्हा बॅँकेने राज्य शिखर बॅँकेकडे असलेल्या साडेपाचशे कोटींच्या ठेवी मुक्त करण्याची परवानगी मागितली.

शिक : जिल्ह्याची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने उद्भवलेल्या आर्थिक आणीबाणीवर मात करण्यासाठी राज्य शिखर बॅँकेकडे असलेल्या सुमारे साडेपाचशे कोटींच्या ठेवी मुक्त करण्याची परवानगी मागितल्याची माहिती जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, मंगळवारपासून (दि. ११) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने धनादेश क्लिअरिंगला सुरुवात केली आहे.सून, दिवसभरात सात ते आठ कोटींचे धनादेश क्लिअर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एका संचालकाने सांगितले.सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट व मुख्य कार्यकारी अधिकारी बोरस्ते यांना जिल्हा परिषदेत पाचारण करून दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. जिल्हा परिषदेचे सुमारे ४० ते ४५ कोटींचे धनादेश वटत नसल्याने दहा हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन, शेकडो सेवानिवृत्तांचे पेन्शन रखडले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने ३१ मार्चला सुमारे २० ते २५ कोटींचे धनादेशही क्लिअर होत नसल्याने मक्तेदारांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे तगादा लावल्याचे चित्र होते. त्यातच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर दादा भुसे यांनी मिलिंद शंभरकर यांना शिक्षकांचे वेतन तसेच सेवानिवृत्तांच्या पेन्शनची रक्कम तत्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात शंभर कोटींची पीककर्ज वसुली करून जिल्हा परिषदेचे धनादेश क्लिअर करण्याची ग्वाही दिली होती.

बुधवारी बैठकजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची बुधवारी (दि. १२) मध्यवर्ती कार्यालयात तातडीची बैठक होत असून, या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अडचणींवर चर्चा होणार आहे. त्यातून काही तरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. संचालक मंडळ नेमका काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्णाचे लक्ष लागून आहे.झेडपी कनेक्शनजिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाट जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे, संचालक केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर, दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर तसेच माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँक आणि जिल्हा परिषदेत समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.त्यातच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनाही सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर दादा भुसे यांनी मिलिंद शंभरकर यांना शिक्षकांचे वेतन तसेच सेवानिवृत्तांच्या पेन्शनची रक्कम तत्काळ अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात शंभर कोटींची पीककर्ज वसुली करून जिल्हा परिषदेचे धनादेश क्लिअर करण्याची ग्वाही दिली होती. (प्रतिनिधी)