शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

...तर आमचे जगणे होईल अधिक सोपे !

By admin | Updated: December 1, 2015 00:01 IST

आर्त हाक : बस भाड्यात सवलत ‘एचआयव्ही’ग्रस्त महिलांना ठरेल आधार

अझहर शेख , नाशिककुणाला सासर, माहेरचा आधार, तर कुणी एकाकीपणे जीवनाशी संघर्ष करत स्वत:चा व आपल्या ‘एचआयव्ही’ग्रस्त मुला-मुलींचे जिद्दीने संगोपन करून शहरातील एचआयव्हीग्रस्त महिलांचा परिस्थितीशी लढा सुरू आहे. बहुसंख्य एचआयव्हीग्रस्त महिला रोजगार व औषधोपचारासाठी घराचा उंबरा ओलांडण्याचे धाडस क रू लागल्या आहेत; मात्र आम्हाला बस भाड्यात निम्म्यापेक्षा अधिक सवलत मिळाल्यास आमचे जगणे अधिक सोपे होण्यास मदत होईल, अशी आर्त हाक यश फाउण्डेशन संस्थेच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या शेकडो एचआयव्हीग्रस्त महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांचा नोंदणीकृत आकडा सुमारे चौदा हजारांच्या जवळपास आहे. त्यामध्ये दोन वर्षांपासून ते सतरा वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या सुमारे सहाशे-सातशे आहे. एचआयव्ही बाधित महिला, पुरुषांसह मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याबरोबरच सकस आहार उपलब्ध करून देत एचआयव्ही व एड्सबाबत जनजागृती यश फाउण्डेशनच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर केली जात आहे. शहरात एचआयव्हीसह कुटुंबासमवेत जगणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. बहुसंख्य महिला मुलाबाळांसह स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच औषधोपचाराकरिता बाहेर पडणाऱ्या एचआयव्ही बाधित महिलांना वाहतुकीचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण होत आहे. ‘त्या’ अनाथ बालकांना हवे केअर सेंटरचे वरदान

शहरासह जिल्ह्यात बहुतांश मुले-मुली एचआयव्हीसह जगत आहेत. पालकांकडून मुलांना आलेल्या एचआयव्हीचा आजार व दगावलेले पालक आणि आजी-आजोबा किंवा अन्य नातेवाइकांकडे राहणारे अनाथ एचआयव्हीग्रस्त बालकांना जगणे कठीण झाले आहे. त्यांच्यासाठी नाशिक जिल्ह्यात पुनर्वसन केंद्र (केअर सेंटर) शासनाकडून सुरू करणे गरजेचे असल्याचे मत एचआयव्हीग्रस्त महिलांनी व्यक्तकेले आहे. कारण अशा एचआयव्हीग्रस्त बालकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून, त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र वरदान ठरेल यात शंका नाही.