शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा इन्स्पेक्टर राज

By admin | Updated: February 5, 2017 22:47 IST

चंद्रशेखर चितळे : ‘अर्थसंकल्प-२०१७’ चर्चासत्रात प्रतिपादन; लोकमत, महाराष्ट्र चेंबर्स, सीए इन्स्टिट्यूटचा सहभाग

नाशिक : केंद्र सरकारने आयकर अधिकाऱ्यांना असलेल्या अधिकाराच्या कक्षा वाढवल्याने देशातील इन्स्पेक्टर राज वाढणार असून, करदात्यांसोबत गैरप्रकार वाढण्याची भीती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा सनदी लेखापाल चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केली. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येण्यापूर्वी इन्स्पेक्टर राज हद्दपार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, नोटाबंदीच्या निर्णयामुुळे अपेक्षित प्रमाणात काळा पैसा बाहेर न आल्याने विचलित झालेल्या सरकारने आयकर अधिकाऱ्यांना अधिक सूट दिल्याचे ते म्हणाले.  शंकराचार्य संकुल येथील डॉ. कूर्तकोटी सभागृहात ‘लोकमत’सह महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (एमएसीसीआयए), सीए इन्स्टिट्यूटची नाशिक शाखा व कर सल्लागार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प-२०१७’ चर्चासत्रात ते बोलत होते.  व्यासपीठावर कर सल्लागार अ‍ॅड. विद्याधर आपटे, एमएसीसीआयएचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा उपाध्यक्ष अनिल लोढा, सीए इन्स्टिट्यूट नाशिकचे अध्यक्ष रवी राठी, उपाध्यक्ष विकास हासे, कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण आदि उपस्थित होते. याप्रसंगी चितळे यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना हा दीर्घकालीन वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत अर्थसंकल्पातील तरतुदींचा शीघ्र परिणाम दिसणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारचे विविध प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष कराचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न असून, २०१९च्या निवडणुकीच मोठ्या प्रमात करात कपात होण्याचे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तवले. सरकारचे करविषयीचे धोरण स्थिर करण्याचे नियोजन असून, करदात्याने भांडवली नफा म्हणून जाहीर केलेले उत्पन्नच करपात्र उत्पन्न धरण्याची तरतूद या सरकारने परिपत्रकाच्या माध्यमातून केली असल्याचे स्पष्ट करतानाच येत्या काळात करातून मिळणारे उत्पन्नही वाढण्याची शक्यता चितळे यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जयप्रकाश गिरासे यांनी केले. (प्रतिनिधी)