शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट’ होणार सक्तीची

By admin | Updated: August 13, 2014 00:42 IST

विनोद तावडे : विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सिडको : शालेय शिक्षण पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. यापुढील काळात महाराष्ट्रात जर भाजपाची सत्ता आल्यास मुलींची अभ्यासाची क्षमता तपासण्यासाठी इयत्ता दहावी व बारावीनंतर काय याबाबत सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्याचे सक्तीचे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी सांगितले.भोळे मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव व प्रवेश सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी तावडे म्हणाले की, सिडको-सातपूर या नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव हा उपक्रम राबविणे आजच्या काळात गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले जाते, परंतु त्यामागील घटना स्पष्ट केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती न कळता त्यातील जिज्ञासा समजली पाहिजे. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. यामुळे घरातील प्रत्येकास इंटरनेट येणे गरजेचे आहे. आपला मुलगा इंटरनेटमध्ये काय करतो याबाबतची सखोल माहिती घरातल्यांना असणे गरजेचे आहे.आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर झालाच पाहिजे परंतु यापलीकडे जाऊन दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे यासाठी भाजपा सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट सक्तीची करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन धोरण अंमलात आणणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.प्रास्ताविकात आयोजक जगन पाटील म्हणाले की, सिडको व सातपूर या पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्या मुला-मुलींचा गौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची गरज असल्यानेच हा उपक्रम घेतल्याचे सांगितले. आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आदिंनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर सतीश कुलकर्णी, देवयानी फरांदे, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकार, बाळासाहेब पाटील, सुहास फरांदे, कैलास अहिरे, सुरेखा पाटील, ललिता भावसार, विक्रम नागरे, प्रकाश अमृतकर, रवि पाटील, हेमंत अहेर, प्रकाश बागुल, आर. आर. पाटील, रामहरी संभेराव, साहेबराव आव्हाड, यशवंत नेरकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)