शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

येवल्यात जबरी चोरी

By admin | Updated: April 2, 2017 00:14 IST

येवला : नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीत शनिवारी (दि. १) दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरमालकाला मारहाण करून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

 येवला : नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीत शनिवारी (दि. १) दुपारी २ वाजेच्या सुमारास घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी घरमालकाला मारहाण करून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.शहरातील नांदगाव रोडवरील समद पार्क कॉलनीतील मो.इस्माईल अब्दुल समद अन्सारी यांच्या राहत्या घरात दुपारी २ वाजेच्या सुमारास मो. इस्माईल व त्यांचे कुटुंब झोपलेले असताना २५ ते ३० वयोगटातील चड्डी - बनियन घातलेले मध्यम रंगाचे हिंदी भाषिक तीन अज्ञात चोरटे घुसले. तीन चोरट्यांपैकी एक चोरटा घराच्या बाहेर उभा राहिला व दोघांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व मो. इस्माईल यांच्या पाठीवर व डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला केला. मो. इस्माईल यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून व मुलाला पळवून नेण्याची धमकी देऊन घरातील मुद्देमाल कुठे ठेवलाय याबाबत विचारणा केली व त्यांच्याकडून कपाटाची चावी घेऊन कपाटातील २५ हजार रुपयाची रोख रक्कम व ८० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने जोरून नेला. त्यामुळे मो. इस्माईल यांच्या फिर्यादीनुसार तीन अज्ञात चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर करत आहेत. (वार्ताहर)