शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

By admin | Updated: June 5, 2016 22:32 IST

रंगभूमीवर घराण्याचा नव्हे, कलेचा विचार

नाशिक : साठच्या दशकात महिला रंगभूमीवर काम करीत असत; मात्र समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. आपल्यासारख्या किर्लोस्कर घराण्यातील महिलेने साधे पेंटर असलेल्या रंगकर्मी बाबूराव सावंत यांच्याबरोबर काम करणे अनेकांना खटकले; मात्र रंगभूमीवर सगळे कलावंत सारखेच असल्याने आपण कधीच भेदाभेद मानला नाही, अशी आठवण ज्येष्ठ रंगकर्मी नीलमताई किर्लोस्कर यांनी सांगितली.सार्वजनिक वाचनालयाच्या ‘ऐसपैस गप्पा’ या उपक्रमात आज ज्येष्ठ रंगकर्मी व शिक्षण अभ्यासक नीलमताई किर्लोस्कर यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात रंजना पाटील यांनी त्यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले. फलकावरील ‘शिक्षणतज्ज्ञ’ हे विशेषण पाहून त्यांनी प्रारंभीच आपण ‘शिक्षणतज्ज्ञ’ नव्हे, तर ‘शिक्षणप्रेमी’ असल्याचा खुलासा केला. लहानपणापासून नाटकाची आवड असल्याने शाळा, महाविद्यालय स्तरावर अभिनय केला. विवाहानंतर नाशिकला आल्यावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘आॅथेल्लो’ नाटकात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या आग्रहाला नकार देणे शक्य नसल्याने आपण भूमिका स्वीकारली. वसंतराव जहागिरदार, दादा नाडगौडा, बाबूराव सावंत हे रंगकर्मी तेव्हा काम करीत. साधे पेंटर असलेल्या बाबूरावांबरोबर नाटकात काम करीत असल्याबद्दल अनेकांनी पतीकडे नाराजी व्यक्त केली. त्यांनी मात्र नाटकात काम करताना घराण्याचा विचार होत नाही, तर सगळे कलावंत एका पातळीवर असतात, असे सांगत आपली पाठराखण केली. आपल्या मनातही कधीच असा विचार आला नाही. पेठे हायस्कूलमध्ये रात्री उशिरापर्यंत तालमी चालत; पण कधीच भीती वाटली नाही. याशिवाय विजया मेहतांबरोबरच्या आठवणीही त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. रसिकांच्या आग्रहावरून नाट्यपदही गाऊन दाखवले.सावानाचे उपाध्यक्ष नरेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी परिचय करून दिला. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)