शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढल्याने तणाव

By admin | Updated: April 17, 2015 23:43 IST

राजीवनगर झोपडपट्टी : दगडफेकीचा प्रयत्न; दोन पोलीस कर्मचारी जखमी; २० आंदोलक ताब्यात

 इंदिरानगर : अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या राजीवनगर झोपडपट्टीत सकाळच्या सुमारास अतिक्रमण विरोधी मोहीम राबविल्यानंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाण्यासमोर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस ठाण्यावर चाल करून आलेल्या सुमारे पाचशे ते सहाशेच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे वीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. राजीवनगर येथे सकाळच्या सुमारास अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर सायंकाळी परिसरात सुमारे पाचशे ते सहाशेचा जमाव जमला. संतप्त रहिवासी प्रचंड घोषणाबाजी करीत इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर आले. त्यांनी पोलीस प्रशासनाला खुले आव्हान देत परिसरातील गाड्या पाडून टाकल्या. काहींनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याने क्षणात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. यावेळी एकच धावपळ उडाली. यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यावेळी पोलिसांनी पीपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे यांच्यासह वीस जणांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर राजीवनगरला पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. प्रारंभी सकाळच्या सुमारास राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण पथक पोलीस फौजफाट्यासह राजीवनगर येथे दाखल झाले होते. अतिक्रमण पथक येताच झोपडपट्टीतील नागरिक जमा होऊन त्यांनी अतिक्रमणाला विरोध दर्शविला. परंतु यापूर्वीच लाल खुणा करूनही जे अतिक्रमण काढले नाही ते अतिक्रमण काढणार असल्याची समजूत काढण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी आम्हाला काही तासांची मुदत द्या, असे सांगितल्यानंतर पालिकेने त्यांना तीन तासांची मुदत दिली. या तीन तासांत अनेकांनी अतिक्रमण काढून घेतले. यावेळी सुमारे ८० पत्र्यांचे शेड नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काढून घेतले. मात्र, ज्यांनी अतिक्रमण काढूले नाही, असे पत्र्याचे शेड व पक्या बांधकामांवर अखेर जेसीबीचा पंजा चालविण्यात आला. या मोहिमेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनावर आरोप करीत रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)