शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी हाणामारीने तणाव

By admin | Updated: February 15, 2017 00:55 IST

परस्पर विरोधात गुन्हे दाखल : दगडफेक, पोलीस बंदोबस्तात वाढ

मालेगाव : येथे दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दोन्ही गटांतील दोन जण जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  काल रात्री तालुक्यातील जळगाव चोंढी गावाजवळ पिकअप अडवून दोघा जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गोवंश रक्षा समितीचे मच्छिंद्र शिर्के, सुभाष मालू व अन्य तिघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शेख फारूक शेख शकील या जखमी झालेल्या तरुणाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख फारूक व शेख फरीद शेख अब्दुल (दोघे, रा. इस्लामपुरा) हे मनमाडकडून पिकअप (क्र. एमएच १७ टी ७९०५) हिच्यातून जनावरे घेऊन येत असताना जळगाव चोंढी गावाजवळ शिर्के, मालू व अन्य तिघा जणांनी वाहन अडवून त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून पुलावरून खाली फेकून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे करीत आहेत. दरम्यान, रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी झालेल्या हाणामारीत उमटले.  विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री व गोवंश रक्षा समितीचे पदाधिकारी मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर अज्ञात टोळक्याने दगडफेक करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिर्के यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त जमावाने येथील जुन्या आग्रा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढली. मंगळवारी ११ वाजेच्या सुमारास गोवंश रक्षा समितीचे शिर्के हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ३९ - ३२४) मोसमपुलाकडे येत असताना अज्ञात २५ ते ३० जणांनी त्यांचे वाहन अडविले. वाहनाच्या सर्व काचांवर दगडफेक करत वाहनाचे मोठे नुकसान केले. यानंतर जमावाने रास्ता रोको आंदोलन केले. अज्ञात हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले.दरम्यान, मनमाडकडून मालेगावकडे कत्तलीच्या हेतूने पिकअप गाडीत जनावरे घेऊन येणाऱ्या दोघा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोवंश रक्षा समितीचे सुभाष मालू यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी ११ जनावरे व पिकअप असा दोन लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्य राखीव दलासह शीघ्रकृती दल व बाहेरगावांहून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)