शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दहा सदस्यांची पुन्हा ‘एंट्री’

By admin | Updated: February 24, 2017 00:58 IST

जिल्हा परिषद : सभापती उषा बच्छाव मात्र पराभूत

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमधून विद्यमान ११ जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी दहा सदस्यांना पुन्हा जिल्हा परिषदेत निवडून देण्याची किमया मतदारांनी केली आहे. विद्यमान सभापती उषा बच्छाव यांना मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.इतकेच नव्हे तर काही विद्यमान सदस्यांचे नातलग निवडून आले, तर काहींच्या नातलगांना पराभवाचे धनी व्हावे लागले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती किरण थोरे व उषा बच्छाव अनुक्रमे विंचूर व वीरगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात उषा बच्छाव यांना भाजपाच्या साधना गवळी यांनी पराभूत केले. तर किरण थोरे यांनी शिवसेनेच्या वेदिका होळकर यांना पराभूत करीत तिसऱ्यांदा निवडून येत हॅट््ट्रिक केली. कळवण तालुक्यातून नितीन पवार कनाशी, माजी अध्यक्ष जयश्री पवार खर्डेदिघर व डॉ. भारती पवार मानूर गटातून निवडून आल्या आहेत. पवार कुटुंबीयांतील तीनही जिल्हा परिषद दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. एकलहरे गटातून मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनसेकडून निवडून आलेल्या सुशीला मेंगाळ यावेळी शिरसाटे गटातून शिवसेनेकडून निवडून आल्या. पालखेड गटातून मागील वेळी निवडून आलेल्या माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर या दुसऱ्यांदा पालखेड गटातून निवडून आल्या आहेत. पेठ तालुक्यातील कोहोर व धोंडमाळ गटातून सासरे भास्कर गावित व स्नुषा हेमलता गावित शिवसेनेकडून निवडून आले आहेत. जायखेडा गटातून राष्ट्रवादीचे यतिन पगार पुन्हा एकदा निवडून आले आहेत.मागील पंचवार्षिक निवडणुकीत सायखेडा गटातून भाजपाकडून निवडून आलेल्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण या सुरगाणा तालुक्यातील हट्टी गटातून भाजपाकडूनच दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)लालदिवा सिन्नर की येवल्यालासर्वाधिक जागा निवडून आलेल्या सिन्नर तालुक्यातून शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे किंवा छगन भुजबळांच्या गडाला शह देणाऱ्या येवला तालुक्यातील राजापूर गटातून जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे किंवा नगरसूल गटातून निवडून आलेल्या माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा सविता पवार यांना अध्यक्षपदाची संधी आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला असल्याने या पदावर आरक्षित गटातून निवडून आलेल्या महिलेला संधी मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे.