शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नोटांच्या कमतरतेवर तात्पुरता इलाज

By admin | Updated: April 18, 2017 01:56 IST

नोटांच्या कमतरतेवर तात्पुरता इलाज

नाशिक : शहर व जिल्ह्यातील बॅँकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नोटांची कमतरता भासत असताना त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी जेमतेम ६५ कोटी रुपये देण्याची तयारी रिझर्व्ह बॅँकेने दर्शविली असली तरी, जिल्ह्यातील चलनवळनाची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅँकेने रोगावर तात्पुरता इलाज चालविला असून, एटीएममधील खडखडाट कायम राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून चलनी नोटांची कमतरता भासत असून, स्टेट बॅँक आॅफ इंडियाने रिझर्व्ह बॅँकेकडे साडेतीनशे कोटी रुपयांची मागणी नोंदवून दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र आज, उद्या असे करत पैसे मिळण्यास अडचणी येत असल्याने सोमवारी स्टेट बॅँक तसेच खासगी बॅँकांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्याची व्यक्त केली जाणारी शक्यता फोल ठरली. शहरी व ग्रामीण भागासाठी स्टेट बॅँकेला जवळपास दररोज दहा कोटीहून अधिक रकमेची मागणी असते, अशीच मागणी अन्य राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बॅँकांनाही असते. परंतु गेल्या आठवड्यापासून स्टेट बॅँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बॅँकांचे जवळपास ७० टक्के एटीएम पैशांअभावी बंद पडल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. स्टेट बॅँकेचा रिझर्व्ह बॅँकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, रिझर्व्ह बॅँकेने कल्याणच्या चेस्ट बॅँकेतून ६५ कोटी रुपये जिल्ह्यासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. यातील ४० टक्के रक्कम शहरी व २० टक्के ग्रामीण भागासाठी वापरण्यात येणार असली तरी, दररोजचे आर्थिक व्यवहार पाहता आणखी चार दिवसांनी हीच परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामानाने खासगी बॅँकांकडे ७० ते ८० कोटी रुपये शिल्लक असल्याने तात्पुरता दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी म्हणून बॅँकेतून तीनपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास बॅँकांच्या अधिभाराच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने नागरिकांनी बॅँकेतून अधिकचे पैसे काढण्यावर भर दिल्याचे बॅँकांचे म्हणणे आहे (प्रतिनिधी)एटीएम बंदच राहणार?रिझर्व्ह बॅँकेकडून सध्या मिळणाऱ्या नोटांवरच शहर व जिल्ह्यातील एटीएमचे भवितव्य अवलंबून आहे. बॅँकेकडून दोन हजार, पाचशे व शंभराच्या किती प्रमाणात मिळतात ते पाहूनच एटीएममध्ये नोटांचा भरणा केला जाणार आहे. त्यामुळे कदाचित अपेक्षित नोटा न मिळाल्यास एटीएममध्ये भरणा केला जाणार नाही.