शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

By admin | Updated: November 12, 2016 02:19 IST

देवस्थानांच्या दानपेट्या मंगळवारी उघडणार

विजय मोरे नाशिकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि़ ८) रात्री पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले़ या निर्णयामुळे देशभरातील देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये काळा पैसा अथवा रद्द केलेल्या नोटा भाविकांनी दान केल्याची शक्यता गृहीत धरून नाशिक विभागातील वादग्रस्त देवस्थानांमधील दानपेट्या मंगळवारी (दि़ १५) सहायक धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर उघडण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे़ भारतीय चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्याने या नोटा बदलून घेण्यासाठी बँका तसेच पोस्ट आॅफिसमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत़ तर बाजारात बेहिशेबी वा काळा पैसा बाळगणारे तसेच भाविकांकडून देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा दान करण्याची शक्यता आहे़ देवस्थानांच्या या दानपेट्यांमध्ये दानरूपी मिळालेल्या नोटा बाहेर काढण्यासाठी दानपेटी उघडावी लागणार आहे़ विश्वस्तांमध्ये वाद नसलेल्या देवस्थानांमधील दानपेट्या सर्वसंमतीने उघडल्या जाऊन त्यातील रक्कम देवस्थानच्या खात्यावर भरण्यात येणार आहे़नाशिकच्या सह धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील देवस्थाने आहे़ त्यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे दीड हजार देवस्थाने असून त्यापैकी चार देवस्थानांमधील विश्वस्तांमध्ये वाद सुरू असल्याने तेथील दानपेट्या सील करण्यात आल्या आहेत़ औरंगाबाद जिल्ह्यातील सह धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी (दि़ ११) देवस्थानांच्या दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले़; मात्र नाशिकमध्ये अशा कुठल्याही प्रकारचे आदेश देण्यात आलेले नाहीत़ दरम्यान, राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे हे शुक्रवारी (दि़ ११) नाशिकमध्ये आले असून, त्यांनी दानपेट्या सील करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत़ वादग्रस्त देवस्थानांच्या सील केलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी मंगळवारी या दानपेट्या उघडण्यात येणार आहेत़